• Total Visitor ( 84748 )

कर्नाटकातून मागविण्यात आलेला गुटखा पुण्यात जप्त ; हडपसर पोलीसांची कारवाई

Raju Tapal January 11, 2022 41

कर्नाटकातून मागविण्यात आलेला गुटखा पुण्यात जप्त ; हडपसर पोलीसांची कारवाई 

कर्नाटकातून मागविण्यात आलेला लाखो रूपयांचा गुटखा पुण्यात जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली. 

सामीउल्हाह मुर्तजा हुसेन वय - ५१ रा.मुंबई मूळ रा.उत्तरप्रदेश असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वाहनचालकाचे नाव असून गुटखा पुण्यातील फुरसुंगी गोडावूनला उतरविण्यास घेवून जात असताना पकडण्याची कारवाई पोलीसांनी केली.

अन्न सुरक्षा अधिकारी अनिल गवते यांनी याबाबत तक्रार दिली.

सर्फराजोद्दिन शेख हा त्याच्या टेम्पो क्रमांक एम एच १४ जे यू ८४६२ मधून  निपाणी व विजापूर येथून गुटखा सोलापूरमार्गे फुरसुंगी येथील गोडावूनमध्ये नेणार असल्याची माहिती हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक  अविनाश शिंदे यांना मिळाली . वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकूळे यांना मिळालेली माहिती देण्यात आली. त्यानंतर या परिसरात सापळा लावण्यात आला.

१५ नंबर चौकात टेम्पो आल्यानंतर तो पकडण्यात आला. ट्रकची पाहणी केली असता पांढ-या पोत्यात ४६ लाख रूपये किंमतीचा  हिरा पान मसाला गुटखा मिळून आला. 

परिमंडळ ५ च्या उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे व पोलीस पथकाने ही कामगिरी केली.

Share This

titwala-news

Advertisement