• Total Visitor ( 84551 )

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध प्रभागात महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध (विद्रुपण) कायद्याअंतर्गत ३० गुन्हे दाखल !

Raju Tapal January 14, 2023 75

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध प्रभागात महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध (विद्रुपण) कायद्याअंतर्गत ३० गुन्हे दाखल !

राजू टपाल.

कल्याण :- महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांचे निर्देशानुसार महापालिका परिक्षेत्रात ठिकठिकाणी सौंदर्यीकरण अभियान सुरु आहे. याच अभियानाच्या अनुषंगाने शहर विद्रुपीकरणात भर टाकणा-या होर्डिग्ज व बॅनर्सवर निष्कासनाची कार्यवाही देखील दैनंदिन स्वरुपात करण्यात येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध (विद्रुपण) कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये १/अ प्रभागाचे सहा.आयुक्त दिनेश वाघचौरे यांनी कल्याण पश्चिम खडकपाडा येथील अरिहंत बिल्डर यांचेवर खडकपाडा पोलिस स्टेशन, कल्याण( प.) येथे आणि टिटवाळा गणपती मंदिर पार्कींग येथील दिल्ली पब्लीक स्कुल, आर.बी.ओ.पी. अकॅडमी व टिटवाळा गणपती मंदिर रोडवरील आनंद होम्स अशा एकूण ३ आस्थापनांवर मांडा टिटवाळा पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले आहेत.

त्याचप्रमाणे २/ब प्रभागात सहा.आयुक्त राजेश सावंत यांनी कल्याण प. परिसरातील स्मार्ट बाजार, ऑलिम्पिक जिम, प्रेरणा कोचिंग क्लासेस, बी.बी.आर.टी. इंटरनॅशनल स्कुल, हाउस ऑफ ३२ डेन्टल केअर अशा एकूण ५ आस्थापनांवर खडकपाडा पोलिस स्टेशन, कल्याण पश्चिम येथे गुन्हे दाखल केले आहेत.

३/क प्रभागात सहा.आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी कल्याण पूर्व येथील शक्ती बेतुरकर चौक ते खडकपाडा सर्कल या परिसरातील स्मार्ट बाईट कॅम्प्युटर, सॅम कॅम्प्युटर, mr फालुदा आणि U२ केक तसेच बैलबाजार येथील ओम सुप्रिमो बिल्डींग समोरील से.झेवियर्स इंटरनॅशनल स्कुल, झोझवाला पेट्रोल पंप समोरील स्पोकन इंग्लिश व श्री देवी हॉस्पीटल समोरील अर्टेक कॅम्प्युटर एज्युकेशन अशा एकूण ६ आस्थापनांवर महात्मा फुले चौक पोलिस‍ स्टेशन, कल्याण पश्चिम येथे गुन्हे दाखल केले आहेत.

४/जे प्रभागाच्या सहा.आयुक्त सविता हिले यांनी कल्याण पूर्व दुर्गा माता मंदिर रोड, कोळसेवाडी येथील श्रीम. कोमल- ग्लॅमर लुक, ड प्रभाग कार्यालयाजवळील श्री.डेव्हीड-टॅटो ॲकॅडमी, श्रीमलंग रोड, स्टॉर सिटी हॉस्पिटल जवळील श्री.मलेशियन शर्मा-हेअर कटींग सलून तसेच श्री.ओमकार-ओमकार ट्रेडिंग असे एकूण ४ आस्थापनांवर/व्यक्तींवर कोसळेवाडी पोलीस स्टेशन, कल्याण पूर्व येथे गुन्हे दाखल केले  आहेत.

५/ड प्रभागाचे सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी कल्याण पूर्व चक्कीनाका येथील एम.एस.बेकर्स यांवर कोसळेवाडी पोलिस स्टेशन, कल्याण पूर्व येथे गुन्हा दाखल केला आहे.

६/फ प्रभागात सहा.आयुक्त भरत पाटील यांनी मानपाडा रोड येथील रुद्राक्ष ज्वेलर्स, गणेश इंटरनेट सर्व्हिस अशा एकूण २ आस्थापनांवर टिळकनगर पोलिस स्टेशन, डोंबिवली पूर्व येथे गुन्हे दाखल केले तसेच ९० फीट रोड येथील युरो किडस्, चोळे गांव येथील बॉक्स बर्न, मानपाडा रोड येथील बीरोबा दर्शन व कस्तुरी प्लाझा समोरील ध्रुव आय.ए.एस ॲकेडमी अशा एकूण ४ आस्थापनांवर रामनगर पोलिस स्टेशन, डोंबिवली पूर्व येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

७/ह प्रभागाचे सहा.आयुक्त सुहास गुप्ते यांनी डोंबिवली पश्चिम घनश्याम गुप्ते रोड, छन्नुर भवन येथील श्री.रोहन शेट्टी-हाऊन टाऊन बार, श्री.राजाराम परब-एस.टेक आय.टी. एज्युकेशन, श्री.राजाराम परब-स्पिकवेल इंग्लीश अकादमी अशा एकूण ३ आस्थापनांवर विष्णुनगर पोलिस स्टेशन, डोंबिवली पश्चिम येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच ८/ग प्रभागातही सहा.आयुक्त संजय साबळे यांनी डोंबिवली पूर्व परिसरातील श्री. साई आरोरा ग्रुप व टंडन रोड येथील श्री.ठाकुर हॉल अशा एकूण २ आस्थापनांवर रामनगर पोलिस स्टेशन, डोंबिवली पूर्व येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहर विद्रुपीकरणात भर घालणाऱ्या रस्त्यांच्या दुभाजकांमधील, विद्युत खांबावरील सुमारे १००० अनधिकृत पोस्टर्स/बॅनर्स काढण्याची कारवाई गेल्या १५ दिवसांत करण्यात आली.

–---------------------------------------

Share This

titwala-news

Advertisement