• Total Visitor ( 393135 )
News photo

वसुलीसाठी बेदम मारहाण करत अपहरण

Raju tapal February 13, 2026 48

वसुलीसाठी बेदम मारहाण करत अपहरण



नग्न व्हिडिओ काढत लिंग कापण्याची धमकी देणाऱ्या सावकारासह पाच आरोपी फरार



वसुलीसाठी बेदम मारहाण करत एकाचं अपहरण करण्यात आलं. त्याचा नग्न व्हिडिओ काढून लिंग कपाण्याची धमकी दिली.

हिल लाईन पोलीस ठाणे



उल्हासनगर :- व्याजाने दिलेली रक्कम परत देत नसल्याचं पाहून एका सावकारानं 30 वर्षीय पीडित तरुणाचं भर चौकातील चायनीज सेंटरमध्ये घुसून त्याला बेदम मारहाण करत अपहरण केलं. त्यानंतर एका लॉजवर डांबून ठेवत लग्न करुन त्याचे नग्नावस्थेत व्हिडिओ काढले, तसंच चाकूनं लिंग कापण्याची धमकी दिली. ही घटना उल्हासनगर कॉम्प नंबर 5 भागातील एका चायनीज सेंटरमध्ये घडली आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अमित चागुला (सावकार ) तरुण, कमल नागदेव आणि दोन साथीदार अशी फरार असलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार चिराग मीरचंदानी (30) हे अंबरनाथ पूर्वेतील आश्रय आनंद इमारतीमध्ये परिवारासह राहतात. त्यांनी आरोपी सावकाराकडून 4 लाख रुपये व्याजानं घेतले होते. त्यानंतर तक्रारदार चिराग यांनी 2 लाख 50 हजार रुपये परत केले. मात्र आरोपी सावकारानं 4 लाख 50 हजाराची मागणी करत तक्रारदार चिराग यांच्यामागे तगादा लावला होता. मात्र भरमसाठ व्याज लावत असल्यानं चिराग हे सावकार अमित याला नकार देत होते. यावरुन वाद होऊन आरोपींनी चिरागचं अपहरण करून मारहाण करण्याचा डाव रचला. ठरल्याप्रमाणे आरोपींनी शोध सुरू केला असता 9 फेबुवारी रोजी रात्रीच्या सुमारास चिराग हे उल्हासनगर कॉम्प नंबर 5 भागातील एका चायनीज सेंटरमध्ये जेवण करत असताना आरोपींना दिसले. त्यानंतर चायनीज सेंटरमध्ये घुसून लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत चिराग यांचे कारमधून बळजबरीने बसवून नेत अपहरण करत बदलापूर येथील ओफिसमध्ये नेऊन पुन्हा बेदम मारहाण केली. त्यानंतर सावकारासह पाचही आरोपींनी चिराग यांना माथेरानमध्ये नेऊन लॉजमध्ये नेऊन कोंडून ठेवलं. या ठिकाणी चिराग यांना नग्नावस्थेत मारहाण करत त्यांचे नग्न व्हिडिओ काढले. आरोपी इथेच थांबले नाही तर त्यांनी चिराग यांना चाकू दाखवत पैसे न दिल्यास लिंग कापण्याची धमकी दिली. चिराग यांच्या बहिणीलाही अश्लील शिवीगाळ करत व्याजाने दिलेल्या पैशाची मागणी केली असता 1 लाख 25 हजार सावकारानं त्याच्या कैलाश नगर भागातील एका व्यक्तीकडे जाम करण्यास सांगितलं,त्याप्रमणे रक्कम जमा केली. चिराग यांची त्यानंतर सावकाराच्या तावडीतून सुटका झाली. दरम्यान,चिराग यांनी १३ फेबुवारी रोजी हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांच्यासोवत घडलेला प्रसग सांगताच पोलिसांनी घटनेचं गांभिर्य पाहून पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१),१४२, १३८,१४० (3),६१ (२),७९,११५ (२),३५२,३५१ (२)सह सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ५,३९ प्रमाणे गुन्हे दाखल केले. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्याशी संपर्क साधला असता सावकारासह पाचही आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी २ पोलीस पथक रवाना केली असून लवकरच सर्वच आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचेही सागितले असून या गुन्हाचा अधिक तपास साहायक पोलीस निरीक्षक बेडकुळे करीत आहेत.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement