कोट्यवधी रूपयांचा गंडा घालणा-या खेड तालुक्यातील साबळेवाडीच्या माजी सरपंचास अटक ; भोसरी पोलीसांची कामगिरी
मोटारी कंपन्यांमध्ये भाड्याने लावतो असे सांगून अडीचशेपेक्षा जास्त लोकांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घालणा-या साबळेवाडी ता.खेड जि.पुणे येथील माजी सरपंचास भोसरी पोलीसांनी अटक केली.
सागर मोहन साबळे वय -३४ असे अटक करण्यात आलेल्या माजी सरपंचाचे नाव असून त्याच्याकडून ऑडी, फॉक्सवॅगन अशा दोन कोटी रूपयांच्या वीस आलिशान मोटारी जप्त करण्यात आल्या.
त्याने खेड,बारामती,दौंड येथील किमान अडीचशे जणांच्या मोटारी कंपनीत न लावता त्या गहाण ठेवून पैसे उकळले.
भोसरी पोलीस ठाण्याचे फौजदार प्रशांत साबळे व पथकाने बीड येथून त्याला मोठ्या शिताफीने पकडले.
पुणे जिल्ह्यातील खेड ५५ , दौंड व बारामती २०, पिंपरी चिंघवड ७० येथून त्याने घेतलेल्या गाड्या बीडमध्ये विकल्या. या मोटारींचे मालक जुगारात हरलेले तसेच कर्जबाजारी झालेल्यांच्या त्यांचे मालक पैसे देत नाहीत तोपर्यंत तुमच्याकडे गहाण ठेवा असे सांगून तो त्यापोटी वीस तीस लाखांच्या मोटारींचे फक्त दोन अडीच लाख रूपये घेत होता. पोलीसांना तो सतत गुंगारा देत होता. त्यासाठी तो आपल्या गावीही काही महिने गेला नव्हता.
सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे,भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रशांत साबळे यांच्या पथकाने ही कारवाई ,कामगिरी केली.