कुलदैवत खंडोबा देवाची पालखी वाजत गाजत
Raju Tapal
May 30, 2022
40
सोमवती अमावस्येनिमित्त शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे कुलदैवत खंडोबा देवाची पालखी वाजत गाजत आज सोमवार दि.३० /०५/२०२२ रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या उपस्थितीत खंडोबा गडावर नेण्यात आली.
सदानंदाचा येळकोट ,येळकोट येळकोट जयमल्हार या जयघोषात संबळ वाद्याच्या साथीत विठ्ठल मंदीरापासून काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात रामदास गायकवाड, कुंडलिकराव पठारे, विलासराव चव्हाण,राजेंद्र सर्जेराव गायकवाड, मधूकर गायकवाड तसेच लहान मुले सहभागी झाले होते.
पालखी सोहळा ग्रामपंचायत चौकात आल्यानंतर पालखीतील कुलदैवत खंडोबा देवाच्या मुखवट्याचे ग्रामस्थ व महिलांनी दर्शन घेतले.
विठ्ठल - रूक्मिणी मंदीर, आर एम धारिवाल सिंहगड कॉलेज रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय, हनुमान मंदीर, शिवशाही चौक, पुणे जिल्हा प्राथमिक केंद्र शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र , स्मशानभूमी रस्ता या मार्गे कुलदैवत खंडोबा देवाची पालखी खंडोबा गडावर नेण्यात आली.
Share This