• Total Visitor ( 428705 )
News photo

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील बिबट्या जेरबंद 

Raju tapal December 05, 2025 74

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील बिबट्या जेरबंद 





शिरूर:- रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीतील एल जी,फियाट कंपनीच्या आतमध्ये वनविभागाने लावलेल्या पिंज-यात गुरूवार दि.४ डिसेंबरला पहाटे बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसून आले. पिंज-यात जेरबंद झालेल्या बिबट्या अंदाजे ५ वर्षे वयाचा नर जातीच्या प्रवर्गातील असून शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी भानूदास शिंदे,मनोज चौधरी,शेरखान शेख,अमोल कुसाळकर,जयेश टेमकर,मंगेश ओव्हाळ,संदीप गव्हाणे आदींच्या उपस्थितीत बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेवून माणिकडोह निवारण केंद्रात बिबट्याची रवानगी करण्यात आली.

            


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement