• Total Visitor ( 681043 )
News photo

होले मळा रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी

Raju Tapal publisher August 29, 2026 20

होले मळा रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी



लोणीकंद:- येथील होले मळा परिसरातील शेतकऱ्यांसाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अंतर्गत रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणाऱ्या २० फुटी सार्वजनिक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या रस्त्यामुळे परिसरातील सुमारे १०० हेक्टर शेतीला वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असून,शेतमालाची ने-आण करणे शेतकऱ्यांना अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रस्त्याअभावी निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तमअण्णा भोंडवे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नारायणराव कंद,माजी उपसभापती रवींद्र कंद,तंटामुक्ती अध्यक्ष संजय सोपान कंद,माजी सरपंच श्रीकांत कंद,सामाजिक कार्यकर्ते जनार्दनआप्पा वाळुंज,गुलाबनाना कंद,सरपंच सागर कंद,अनिल होले,संजय होले,किरण होले,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. होले भाऊकीतील आपापसांतील तंटे व मतभेद सामोपचाराने मिटवून सार्वजनिक रस्त्यासाठी मार्ग मोकळा करण्यात प्रदीप कंद व तंटामुक्ती अध्यक्ष संजय कंद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत नेणे, शेतीसाठी आवश्यक साहित्य शेतापर्यंत पोहोचवणे तसेच दैनंदिन वाहतूक करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा रस्ता विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.अनेक वर्षांपासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने होले व शिंदे मळा परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत प्रदीप कंद व संजय कंद यांचे आभार मानले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांची प्रतिक्रिया हा रस्ता झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. परिसरातील इतर प्रश्नही मार्गी लागण्यास मदत होईल. या रस्त्याचा सर्वांनाच फायदा होणार असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक असलेली कामे पुढेही प्राधान्याने मार्गी लावली जातील.”


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement