• Total Visitor ( 430392 )
News photo

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धापनदिन साजरा

Raju tapal July 23, 2025 71

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धापनदिन साजरा



६३ व्या वर्धापण दिनी विद्यार्थांना लेखन साहीत्याचे वाटप



अमरावती :- महाराष्ट्रातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी.... शिक्षकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत गतिमान आणि कार्यशील असणारी..... शिक्षकांसाठी न्याय मिळवून देणारी अशी संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.......

शिक्षण क्षेत्रातील सर्वाधिक योगदान देणाऱ्या शिक्षकाच्या न्याय हक्कासाठी लढणारी..... त्याग आणि सेवा ब्रीदवाक्य समोर ठेवून शिक्षकांसाठी प्रामाणिकपणे  काम करणारी महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती आज मंगळवार दिनांक 22 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भातकुली तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. यावेळी संस्थापक कै.भा.वा.शिंपी यांच्या प्रतिमेस अभिवादन व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तालुक्यातील उत्तमसरा येथिल विद्यार्थांना चिञकला वही व बुक आणि कोलटेक शाळेतील विद्यार्थांना बुक वाटप करण्यात आले. या करीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर व अमरावती जिल्हा सरचिटणीस शैलेन्द्र दहातोंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

=====================



 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement