• Total Visitor ( 84900 )

माजी खासदार निलेश राणे यांना अपमानास्पद शिवीगाळ

Raju Tapal March 13, 2023 73

माजी खासदार निलेश राणे यांना अपमानास्पद शिवीगाळ,
बदनामी केल्याचा प्रकार; सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

माजी खासदार निलेश राणे यांना ट्विटरवर अपमानास्पद शिवीगाळ करुन त्यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत योगेश अरुण शिंगटे (वय ३८, रा. डेक्कन) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १/२३) दिली आहे. त्यानुसार राहुल मगर नावाच्या ट्विटर अकाऊंट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ११ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल मगर नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन माजी खासदार निलेश नारायण राणे यांच्या ट्विटर अकाऊंट वर 'आर नाल्या तुला तुझ्या आई आणि बायको मधला फरक कळत नाही. तु काय लायकी आहे.तुझ्या बापाला किती किंमत आहे, निल्या किती चालणार' असे ट्विट केले.तसेच ठाणे येथील एका महिलेच्या ट्विटर अकाऊंटवर अश्लिल भाषा वापरुन ट्विट करुन दोघांना अपमानास्पद शिवीगाळ करुन त्यांची बदनामी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहायक पोलीस निरीक्षक ननवरे तपास करीत आहेत.

Share This

titwala-news

Advertisement