मांडा टिटवाळा ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन
साई स्वर मंडळ मांडा टिटवाळा यांचा उपक्रम
राजू टपाल.
टिटवाळा :- साई स्वर मंडळ मांडा टिटवाळा यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी श्री दत्त जयंती निमित्ताने मांडा टिटवाळा ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर रोजी करण्यात आलेले आहे. सदर पालखी सोहळा मंडळाचे यंदा १३ वे वर्ष आहे. सदरील पालखी सोहळ्यासाठी वय वर्षे १६ पूर्ण असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार असून प्रवेश शुल्क केवळ नाममात्र ५०१ रुपये ठेवण्यात आलेले आहे. सदरील पालखी सोहळा २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान श्री.साई बाबांच्या पादुकांचे पूजन होईल त्यानंतर ७ ते ८ वाजताच्या दरम्यान साई पादुकांचे दर्शन भक्तांसाठी ठेवण्यात आलेले आहे. सकाळी ८ ते साडे आठ पर्यंत मान्यवरांचे स्वागत तर साडे आठ वाजता पदयात्रेस सुरुवात होईल. दुपारी खडवली येथील स्वामी समर्थ मंदिर येथे मुक्काम तर खातिवली येथील रुपेश गुजरे यांच्या निवासस्थानी मुक्काम होणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी दुपारचा मुक्काम आटगांव येथील श्री संघवी गोल्डन सिटी तर रात्रीचा मुक्काम खर्डी येथील हॉटेल तुलीप च्या जवळील उमा रेसिडेन्सी येथे होणार आहे. २७ नोव्हेंबर दुपारी लतिफ़वाडी येथील बाबा का ढाबा येथे तर रात्री इगतपुरी येथील हॉटेल टायगर व्हॅली येथे मुक्काम होईल. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी पिंपळगांव मोर येथील संपतराव काळे यांच्या निवासस्थानी तर रात्रीचा मुक्काम हा कवडदरा येथील हॉटेल साई सृष्टी येथे होईल. २९ नोव्हेंबर रोजीच दुपारी सिन्नर घाट पायथा येथील घोरवड मधील सखाराम गणपत हगवणे यांच्या इथे होईल. रविवारी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी खोपडी येथील पंचकृष्ण उपहारगृह तर रात्रीचा मुक्काम वावी येथील साई भक्त निवारा या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर १ डिसेंबर रोजी दुपारी पोहेगाव येथील भाऊसाहेब औताडे यांच्या निवासस्थानी तर रात्रीचा मुक्काम शिर्डी येथील श्री साई धर्मशाळा येथे मुक्काम करण्यात येणार आहे. तर मंगळवार २ डिसेंबर रोजी श्री साईंचे दर्शन करण्यात येणार आहे. तर साई भंडारा शनिवारी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत जलाराम अपार्टमेंट च्या बाजूला,मनसे कार्यालय,गणेश मंदिर रॉड मांडा टिटवाळा पूर्व येथे ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व साई भक्तांनी या पदयात्रा सोहळ्यास जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती साई स्वर मंडळाचे संस्थापक दिनेश भोय,अध्यक्ष नितेश गराटे,उपाध्यक्ष अनिल दळवी,प्रशांत कांबळे,सचिव बजरंग भंडारी,खजिनदार संजीत चव्हाण यांनी केलेले आहे.