• Total Visitor ( 85009 )

मांडवगण फराटा येथील ए टी एम लुटणा-या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक

Raju Tapal November 21, 2021 42

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे धाडसी दरोडा टाकून ए टी एम मशीनसह ८ लाख ३८ हजार रूपयांची रोकड लंपास करणा-या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी अटक केली.

मल्हारी भीमराव केदार वय -२९ , बाळासाहेब एकनाथ केदार ,संभाजी त्रिंबक मिसाळ सर्वजण रा. सर्वजण शिरूर कासार जि.बीड  अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे ७ ऑक्टोबरला ,दौंड तालुक्यातील खडकी येथे १० ऑक्टोबरला ए टी एम चोरीचे गुन्हे घडले.होते. पहाटेच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीत येवून ए टी एम मशीनसह रोकड लांबविण्यात आली होती. याबाबत शिरूर व दौंड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना स्कार्पिओ गाडी आष्टी बाजूकडे गेल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले होते. पोलीसांनी सापळा रचून मल्हारी भीमराव केदार, बाळासाहेब एकनाथ केदार, संभाजी त्रिंबक मिसाळ या आरोपींना ताब्यात घेतले . गुन्ह्यात वापरलेली गाडी हडपसर परिसरातून चोरल्याचे,दोन्ही गुन्हे केल्याची आरोपींनी कबूली दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक अशोक शेळके, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे,संदीप येळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहाय्यक फोजदार तुषार पंदारे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, चंद्रकांत जाधव, सचिन घाडगे,विजय कांचन,  अजय घुले, योगेश नागरगोजे, धीरज जाधव, सहाय्यक फौजदार मुकूंद कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Share This

titwala-news

Advertisement