मनमाड शहर मध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, येथील स्थानिक ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने स्विफ्ट डिझायनर गाडीतून चोरटे फरार
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामधील मनमाड शहरातील कॅम्प भागातील महावितरण कार्यालयाच्या शेजारी असलेल्या खाजगी एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. परंतु नागरिकांनी आरडाओरड केल्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न
अ यशस्वी ठरला. मनमाड शहरातील त्या भागातील महावितरण कार्यालयाच्या शेजारी असलेल्या खाजगी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु स्थानिक नागरिकांच्या विविध प्रकार लक्षात आल्याने नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. सदर चोरट्यांनी त्यांच्या दिशेने दगडफेक करत पळाले. नागरिकांनीदेखील चोरट्यांच्या दिशेने दगडफेक करत पाटला केला मात्र चोरट्यांनी स्विफ्ट डिझायनर गाडीतून पळ काढला. मनमाड शहरामध्ये चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत असून छोट्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरी सदर पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष घालावे अशी चर्चा मनमाड शहरात मध्ये नागरिक करत आहेत.