• Total Visitor ( 658001 )
News photo

आपटी गावातील विवाहित महिला बेपत्ता 

Raju Tapal publisher August 07, 2026 66

आपटी गावातील विवाहित महिला बेपत्ता 





फुलगाव ( गौतम पाटोळे ) :-आपटी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील विवाहित महिला राहत्या घरातून 4 ऑगस्ट 2026 रोजी ब्लाऊजचे साहित्य आणण्यासाठी कोरेगाव भीमा येथे जाते असे सांगून गेली. ती अद्याप पर्यंत घरी आली नाही. पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद पती अविनाश भगवान गाडेकर यांनी शिक्रापूर पोलीस ठाणे येथे दिली आहे.  निकिता भगवान गाडेकर वय 30 वर्षे,राहणार आपटी असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तिचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. शिक्षण बीकॉम,रंग गोरा,उंची चार फूट आठ इंच,चेहरा गोल,नाक सरळ,केस काळे,शरीर प्रकृती मध्यम,डोळे काळे,अंगावर हिरवा पंजाबी ड्रेस व हिरव्या रंगाचे स्कार्फ परिधान केले आहे. पायात ग्रे रंगाचा बूट,गळ्यात मंगळसूत्र,डाव्या बाजूला गळ्यावर तीळ,मराठी,हिंदी भाषा बोलते. वरील वर्णनाची विवाहित महिला कोणाला आढळल्यास त्वरित शिक्रापूर पोलीस ठाणे अगर अविनाश भगवान गाडेकर दूरध्वनी क्रमांक 72 76 26 60 17,95 78952222,8600994899,9766860073 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.  असे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement