भिलारवाडी ता.करमाळा येथील पत्नी व मुलीचा खून करून फरार झालेल्या संशयित आरोपीस पंढरपूर येथे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली.
अण्णासाहेब भास्कर माने वय - ४१ रा.भिलारवाडी ता.करमाळा असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
८ नोव्हेबरला भिलारवाडी येथे पत्नी लक्ष्मी माने वय -३५ व मुलगी श्रुती वय - १३ यांचा खून करून आरोपी फरार झाला होता.
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये श्री.विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. गोपनीय स्त्रोतांमुळे संशयित मानेची माहिती मिळाल्यावर गर्दीतही त्याला ओळखून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
मुलीसह पत्नीचा खून करून फरार झालेल्या बापाविरूद्ध करमाळा पोलीसांत गुन्हा दाखल झाला होता.
मृत लक्ष्मी माने यांचा देवळाली येथील भाऊ कमलेश गोपाळ चोपडे वय - ३० रा.देवळाली ता.करमाळा यांनी फिर्याद दिल्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.