महाराष्ट्राती एक नंबर ची म्हसा यात्रा होणार की नाही याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
काही वर्षाची परंपरा असलेली मुरबाड तालुक्यातील म्हसा गावी भरणारी म्हसायात्रा भरणार की नाही असे समभ्रम व्यापारी व यात्रेकरूत निर्माण झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील सर्वात भोठी व सलग 15 दिवस चालणारी म्हसा यात्रा महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या यात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून व्यापारी व्यापार करण्यासाठी येत असतात. करोडो रूपयाची उलाढाल होणारी यात्रा म्हणून या यात्रेकडे व्यापा-यांचे लक्ष असते.खिल्लारी बैलासाठी ही यात्रा प्रसिद्ध असल्याने खिल्लारी बैल विकणारे व्यापारी व खरेदी करणारे हौसी खरीतदार या यात्रेची वाट पहात असतात. म्हसोबा देवाला नवस करणारे व नवस फेडणारे भाविक वर्षातून एकदा या यात्रेत येत असतात. यात्रेकरूंचे मनोरंजन करण्यासाठी तमाश्याचे फड, रेकाँड डान्स, मौतकाकुवा असे अनेक खळ या ठिकाणी येऊन आपला गल्ला भरून नेत असतात. दोनसे वर्षात कधीही खंड न पडलेल्या या यात्रेला मात्र मागील वर्षी कोरोनाच्या महामारी मुळे खंड पडला होता. यात्रा न झाल्याने करोडो रूपयाची नुकसान झाल्याने व्यापारी वर्षात नाराजी पसरली होती. या यात्रे मुळे गावालाही मोठ्या प्रमाणात अर्थिक फायदा होत असल्याने गावकरीही नाराज झाले होते. या गावाच्या परीसरातील छोटेमोठे व्यापारी या यात्रेत हाँटेल, खानावळी, वडापावच्या गाड्या, थंडगार सर्बताच्या गाड्या, विविध खेळण्याची दुकाने, मिठाईची दुकाने लाऊन आपला वर्षाचा अर्थिक कोठा पुरा करत असल्याने या यात्रेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. ही यात्रा जानेवारी महीन्यात पोर्णिमेला भरत असल्याने सर्वाचे लक्ष ही यात्रा होणार की नाही याकडे लागले आहे. शासनाच्या वतीने या यात्रेचे नियोजन तहसीलदार करत असल्याने त्यांनी ही यात्रा होणार की नाही हे जाहीर करावे असी मागणी व्यापारी व यात्रेकरू यांच्याकडून होत आहे.