ठाकुर्ली खाडी किनारी परिसरात भरदिवसा मुलीवर सामूहिक अत्याचार
ठाकुर्ली खाडी किनारी परिसरात धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समाेर आली आहे. या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेत दाेघांचा समावेश असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
या घटनेबाबत विष्णू नगर पोलीस ठाण्यात दाेन अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत. या घटनेमुळे संबंधित मुलीला जबरदस्त धक्का बसला आहे.
संबंधित मुलगी तिच्या मित्रासोबत शुक्रवारी खाडी परिसरात फिरायला गेली हाेती. त्यावेळी दाेघांनी त्यांना पोलीस असल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर मुलीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेची नाेंद रात्री पाेलिस ठाण्यात झाली. विष्णू नगर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.