• Total Visitor ( 429872 )
News photo

माॅडर्न महाविद्यालयाच्या हिवाळी शिबिराचा फुलगाव (ता.हवेली )येथे समारोप 

Raju tapal December 11, 2025 306

माॅडर्न महाविद्यालयाच्या हिवाळी शिबिराचा फुलगाव (ता.हवेली )येथे समारोप 

 

शिरूर:- शिवाजीनगर,पुणे येथील माॅडर्न कला,विज्ञान,वाणिज्य महाविद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबिर हवेली तालुक्यातील फुलगाव‌ येथे १ डिसेंबर २०२५ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या हिवाळी शिबिराचा समारोप झाला. फुलगावचे प्रशासक एस.आर.मोरे  यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. फुलगावचे  माजी सरपंच सुनीलदादा वागस्कर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. माजी उपसरपंच राहुलदादा वागस्कर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.   फुलगावचे माजी सरपंच कांताराम वागस्कर,शंकर वागस्कर,सोमनाथ वागस्कर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.विठ्ठल देवढे प्रा.डॉ.वैशाली आहेर समिती सदस्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. या सात दिवसांच्या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले गेले.सुनीलदादा वागस्कर यांनी "अध्यात्म व विज्ञान" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. नरेंद्र नायडू यांनी "युवाप्रेरणा स्वामी विवेकानंद"या  विषयाच्या माध्यामातून  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केेले.मा.योगेश ठिपसे  यांनी "व्यवसाय मार्गदर्शन" या विषयावर व्याख्यान दिले. प्रा.विजय अंधारे यांनी "व्यक्तीमत्त्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या सात दिवसात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून वृक्षारोपण,गावातील दत्त मंदिर परिसर व पालखी मार्ग तसेच महादेव घाट परिसराची स्वच्छता इ. कामे केली. तसेच ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्थांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती घेतली. गावातील ग्रामस्थांशी संपर्क साधून गावच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे घटक तसेच भविष्यकालीन योजनांविषयी चर्चा केली.शिबिराच्या शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. अशाप्रकारे व्याख्याने,गटचर्चा,प्रात्यक्षिके,प्रत्यक्ष अनुभव,वृक्षारोपण,श्रमदान,ग्राम विकास,सामाजिक बांधिलकी,देशभक्ती,पर्यावरण संरक्षण,आणि आरोग्याविषयी जागरूकता इ. गोष्टी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुभवता आले. या शिबिराच्या समारोप समारंभाचे अध्यक्षस्थान मॉडर्न कला, विज्ञान  व वाणिज्य महाविद्यालयाच्या मा.प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी भूषविले.यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपून समाजाप्रति असलेल्या कर्तव्यांची जाणीव करून दिली.मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक दिलीप खंडाळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. फुलगावच्या माजी सरपंच  मंदाकिनी साकोरे (नानी) माजी उपसरपंच राहुलदादा वागस्कर यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले.महाविद्यालयाच्या प्राचार्या,उपप्राचार्य,पर्यवेक्षक,पर्यवेक्षिका,तसेच फुलगावचे माजी सरपंच,माजी उपसरपंच,सामाजिक कार्यकर्ते, पदाधिका-यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी  फुलगावचे माजी सरपंच.कांताराम वागस्कर,माजी सरपंच सुनील वागस्कर,मा.भानुदास वागस्कर,मुलींच्या सैनिकी शाळेचे व्यवस्थापक अर्जुन शिंदे सर,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विठ्ठल देवढे  प्रा.डॉ.वैशाली आहेर,राष्ट्रीय सेवा योजना समितीतील सदस्य,NSS चे स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. या सात दिवसीय हिवाळी शिबिरातून उत्कृष्ट स्वयंसेवकांना महाविद्यालयाच्या मा.प्राचार्या डॉ.निवेदिता एकबोटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल देवढे यांनी केले. डॉ.वैशाली आहेर यांनी प्रास्ताविक केले तसेच आभारही मानले .


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement