मोरोशी पी एस सी चा पुन्हा एकदा सावळा गोंधळ
मुरबाड तालुक्यातिल मोरोशी पीएसएच्या वारंवार तक्रारी येथातच तसाच काहिचा प्रकार आज घडला फांगुळगव्हाण येथिल पेशंट पी. एस. सी ला पावणे आठच्या सुमारास गेल्यावर दवाखाना हा रिकामा वाटला परंतु थोड्या वेळाने आवाज दिल्यानंतर सिस्टर आल्या पण एकही डॉक्टर तिथे नव्हता बाजूला कोणत्या तरी रूम मध्ये असताना देखील पेशंटला पाण्यासाठी आला नाही, सिस्टरांनी दोनदा कॉल केला परंतु डॉक्टर तेथे तपासायला आले नाहीत, पेशंट च्या नातेवाईकांनी अर्धा तास वाट पाहिल्यानंतर ते प्रायव्हेट दवाखान्यात गेले, मग या ग्रामीण भागात या सरकारी दवाखान्यांचा फायदा काय की जाणून बुजून आदिवासी भागात आसल्या मुळे मुद्दाम होत आहे की कायअसा प्रश्न उपस्थित होतो, या ग्रामीण भागातल्या पी एस सी आहेत तेवढ्यांवर सीईओ यांनी स्वतः लक्ष देऊन यांवर उपाय काढावे असा सवाल किरण कारभळ यांनी केला आहे,
प्रतिनिधी - किरण कारबळ मुरबाड