मोटरसायकल चोरी करणा-या दोघांना कोपरगाव शहर पोलीसांनी अटक करून ८ लाख ३० हजार रूपये किंमतीच्या २० दुचाकी जप्त केल्या.
गोविंद संजय शिंदे रा.बेट कोपरगाव, आशिष राममिलन कोहरी रा.पुणतांबा चौफुली कोपरगाव मूळ रा. अमेठी उत्तरप्रदेश या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून नाना पानसरे हा त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे.
१९ मे २०२२ रोजी बेट भागातून किशोर दिघे यांची दुचाकी चोरीला गेली होती. या चोरीप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली आर पी पुंड, जे पी तमनर ,संभाजी शिंदे, राम खारतोडे, जी.व्ही काकडे या पोलीसांच्या पथकाने नाकाबंदी करून ही कारवाई केली.