• Total Visitor ( 429529 )
News photo

मोटरसायकल चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद;पारगाव पोलीसांची कामगिरी 

Raju tapal January 09, 2026 40

मोटरसायकल चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद;पारगाव पोलीसांची कामगिरी 

         

शिक्रापूर:- मौजमजा करण्यासाठी मोटरसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्याची  कामगिरी पारगाव पोलीसांनी केली आहे. रितेश फकीरा रोकडे वय -१८ रा‌.चांडोह,हर्षद जालिंदर ढवळे वय- २१ रा‌.फाकटे,प्रथमेश दत्तात्रय ढवळे वय -१९ रा‌.फाकटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून चोरीस गेलेल्या २७ मोटरसायकली पोलीसांनी आरोपींकडून जप्त केल्या. २५ डिसेंबर २०२५ रोजी जारकरवाडी ता‌.आंबेगाव येथून एक अॅक्टिव्हा स्कूटी चोरीस गेली होती. या तक्रारीच्या आधारे पोलीसांनी तपास करताना ही कामगिरी केली.

पारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे‌,उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे,अंमलदार संजय साळवे,मंगेश अभंग,चंद्रकांत गव्हाणे,अविनाश कालेकर यांनी ही कामगिरी केली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement