मौजमजेसाठी दुचाकी चोरणा-या तिघांना अटक
मौजमजेसाठी दुचाकी चोरणा-या तिघांना अटक करण्यात आली.
युनूस निजाम मुल्ला वय -२५ रा.गल्ली नं. १६ सय्यदनगर, हडपसर मूळ रा.चिंचोली ता.उमरगा जि.उस्मानाबाद , हनुमंत शंकर वाकडे वय -२२ , मु.पो.आलूर ता.उमरगा जि.उस्मानाबाद, दीपक उर्फ खंडू तातेसाहेब कटकधोंड वय -२४ रा.केसरजवळा ता.उमरगा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे.
हडपसर पोलीस स्टेशनमधील भाजीपाला मार्केट, बाजारपेठ, मॉल, या गर्दीच्या ठिकाणी पोलीस गस्तीवर होते. त्यावेळी हडपसर हद्दीतून एक अल्पवयीन मुलासह दोघेजण दुचाकी चोरून सोलापूर महामार्गाने जात असल्याची माहिती मिळाल्यानूसार पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अल्पवयीनसह दोघेजण वाहनांची टेहळणी करत असल्याचे समजले. त्यानंतर फुरसुंगीतील सार्वजनिक शौचालयाजवळ सापळा रचून संशयावरून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून पाच लाख रूपये किंमतीच्या १३ दुचाकी जप्त केल्या.
सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविद गोकुळे, पोलीस निरीक्षक गुन्हे राजू अडागळे, दिगंबर शिंदे यांच्या सुचनांप्रमाणे ही कारवाई करण्यात आली.