मुरबाड पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी,लाखोंचे लोखंडी सेन्ट्रेग प्लेट चोरणारेचोर रंगेहात पकडले
Raju Tapal
June 26, 2023
200
मुरबाड पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी,लाखोंचे लोखंडी सेन्ट्रेग प्लेट चोरणारेचोर रंगेहात पकडले
-------------------
मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलिसांनी केलेल्या कामगिरी मुळे संपूर्ण सरळगाव, मुरबाड परिसरात मुरबाड पोलिसांचे भरभरून कौतुक होत आहे.
दिनांक २५/६/२३ रोजी रात्री मुरबाड पो स्टे अन्तर्गत सरळगाव चौकात नाकाबंदी लावण्यात आली होती तिथे पो ह. भरत ननवरे ,pn. जीवन पाटील,देवरे, व पथक हजर होते
नाकाबंदी चालू असताना ०४.४५ वाजे सुमारास एक संवशयित टेम्पो क्र Mh04-LE-7906 व आटो रिक्षा क्रMH05-DQ-5719 हे एका मागे एक असे वेगाने आले नाका बंदी पोलिसांनी थांबण्याबाबत इशारा केला असता ते नथांबता पोलिसांना हुलकावणी देवून पुढे वाहन घेवून गेले पोलिसांनी पाठलाग करण्यास सुरुवात करताच त्यांनी सदर् वाहने रोडच्या बाजूला लाऊन पळून गेले
पोलिसांनी सदर् टेम्पो व रिक्षा ची पाहणी केली असता त्यात लोखंडी सेन्ट्रेग प्लेट मिळून आले ते पंचनामा करून ताब्यात घेतले
यातील फ़िर्यादी शोधून त्यांच्या तक्रारी वरून चोरीचा गुन्हा दाखल केला त्यात ५०७०००/ रु किमतीचे (पाच लाख, सात हजार रु) सेन्ट्रेग लोखंडी प्लेट, टेम्पो किंमत ३०००००/( तीन लाख), रिक्षा किंमत १००,०००/( एक लाख ) चे साहित्य व वाहने अनुक्रमे जप्त केली आहेत
गुन्हा दाखल होताच सदर् गुन्ह्याचा तपास psi. निंबाळकर,Hc.भरत ननवरे, pn.जीवन पाटील, देवरे यांनी अतिशय गतिमान तपास करून सदर् गुन्ह्यात पाहिजे असलेले ४ चार आरोपींना खास गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळवून सीताफ़िने अटक केली आहे
अटक आरोपींना ३० तारखे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे अजून तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत
मुरबाड पोलीसांच्या ह्या कामगिरीने संपूर्ण चोरांचे धाबे दणाणले आहेत चोरी करण्याचे धाडस आता त्यांच्यात उरले नाही इतकी प्रभावी कारवाई मुरबाड पोलिसा कडून झाली आहे
गत काळात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड पोलिसांनी आयोजीत रिंग राउंड गस्त, VDP- ग्राम सुरक्षा रक्षक दल, प्रभावी नाकाबंदी, व्हिजिबल पोलिसिंगला मोठे यश आले आहे
त्या मुळे नित्य उत्कृष्ट पोलीस कामगिरीने मुरबाडकर नागरिक सुखावले आहेत व मुरबाड पोलिसांचे कौतुक होत आहे
Share This