नाशिक येथे महाराष्ट्र शेरा सर्पमित्र आघाडीची बैठक संपन्न, उपस्थित पदाधिकार्यांचा सत्कार
लोकनेते राजाभाऊ साबळे यांनी संपूर्ण महाराष्ट्र भर सर्व सर्व मित्रांना एकत्र करून महाराष्ट्र सेना सर्पमित्र आघाडी सुरू केले असून या महाराष्ट्र सेना आघाडीमध्ये महाराष्ट्रातील सर्पमित्रांना योग्य ते मार्गदर्शन करून तसेच शासनाला देखील सर्पमित्र विषयी सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे निवेदन देण्यात येणार आहे. यानिमित्ताने नाशिकच्या शासकीय निवासस्थान येथे उत्तर महाराष्ट्रातील सर्व मित्रांची परिषद भरविण्यात आली होती. या परिषदेत जळगाव, धुळे, नाशिक, औरंगाबाद तसेच मराठवाड्या-
तील सर्पमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अशोक तायडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, गणेश गाडेकर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, विलास जाधव मराठवाडा प्रमुख, चंद्रकांत पाटील औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष
अमित गावडे नाशिक जिल्हा अध्यक्ष, तनिष्का शिरसाठ जळगाव जिल्हा अध्यक्ष हे सर्व महाराष्ट्र सेना सरपमित्र आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. या परिषदेच्या वेळी उपस्थित असलेल्या सर्व मित्रांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिक मध्ये गेल्या तीस वर्षापासून अनेक प्रकारचे साप पकडून नागरिकांना मदत केली मनीष भाऊ यांनी मार्गदर्शन केले. तसेच यापुढील सर्पमित्र आज काही अडचणी आल्यास महाराष्ट्रातील संपूर्ण सर्पमित्र एकत्र येऊन आपल्या सर्व मित्रांना मदत करण्यासाठी पुढे यावे असे आपली सामाजिक विषयाची सेवा ही अत्यावश्यक असून महाराष्ट्र सेना या संघटनेला बळकटी देऊन शासनाकडून सर्पमित्रांच्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडू असे या परिषदेत ठरविण्यात आले असल्याची माहिती अशोक तायडे यांनी दिली.