नवनाथ दिंडी सोहळ्याचे कोंढापुरी येथून आळंदीकडे प्रस्थान
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- श्री.नवनाथ दिंडी सोहळ्याचे कोंढापुरी येथून आज शुक्रवार दि.१४ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता आळंदीकडे प्रस्थान झाले. सकाळी ८ वाजता कोंढापुरी येथील विठ्ठल रूक्मिणी मंदीरात पायी दिंडीत सहभागी होणारे भाविक,ग्रामस्थ वारकरी जमा झाले होते. सकाळी ९ वाजता नवनाथ दिंडी सोहळ्याचे विठ्ठल रूक्मिणी मंदीरातून ग्यानबा तुकाराम,ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात प्रस्थान झाले. टाळ,मृदंगाचा गजर,भगव्या पताका,महिलांनी डोक्यावर घेतलेली तुळस,हरिनामाचा जयघोष यामुळे सकाळच्या प्रहरी कोंढापुरी तील वातावरण भक्तिमय झाले होते. गायक ह.भ.प.विष्णू महाराज काकडे,मृदंगाचार्य सतिश महाराज कापसे , ग्रामस्थ भाविक सतिश फक्कडराव गायकवाड,माणिकराव रामचंद्र गायकवाड,बापुराव दादासाहेब गायकवाड, संपतराव आबासाहेब गायकवाड,विजय संभाजीराव ढमढेरे,बाळासाहेब धोंडीबा गायकवाड,मधूकर जगन्नाथ गायकवाड,दिलीप केरूभाऊ गायकवाड,विलासराव सहादू चव्हाण,मनोहर राजाराम गायकवाड,गंगाराम सरडे,अंबर राधूजी गायकवाड,अर्जून रामचंद्र गायकवाड तसेच ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळातील महिला पायी दिंडी वारी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी उपस्थित होते. सत्यवान भुजबळ,विठ्ठल महिपती जाधव,मुरलीधर केरबा गायकवाड,कैलास मोहिते,काका गरूड,प्रकाश खलाटे,चंद्रकांत खलाटे,संजय गायकवाड यांच्या वतीने दिंडीतील सहभागी वारक-यांची चहा,नाष्टा,जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.कोंढापुरी,कवठीमळा,कासारी फाटा,२४ वा मैल,मलठण फाटा,शिक्रापूर,चाकण चौक,मांढरे वस्ती चाकण रोड,जातेगाव खुर्द,करंदी,पिंपळे जगताप,चौफुला,बहुळ,शेल पिंपळगाव,वडगाव घेणंद अशी मजल करत कोंढापुरी नवनाथ दिंडी सोहळ्यातील वारकरी दि.१५ नोव्हेंबरला ज्ञानसागरसमोरील ह.भ.प.चौधरी महाराज यांच्या धर्मशाळेत संध्याकाळी मुक्कामी पोहचणार आहे असे मधुकर गायकवाड यांनी सांगितले.