• Total Visitor ( 85075 )

नितीन गडकरींना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन

Raju Tapal January 14, 2023 44


नितीन गडकरींना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन,दाऊदच्या नावाने मागितली 2 कोटींची खंडणी

नागपूर,14 जानेवारी :-भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपूर येथील कार्यालयात नितीन गडकरी यांना 3 वेळा फोन करून धमकी देण्यात आली आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने ही धमकी देण्यात आली असून 2 कोटी खंडणी मागितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील खामला परिसरातील कार्यालयामध्ये आज सकाळी धमकीचे फोन आले. सकाळी 11.30 वाजता पहिला फोन आला.त्यानंतर आणखी फोन करण्यात आले.फोन करून गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिली.

एकूण 3 वेळा फोन करण्यात आले होते.11.30 आणि 12.40 मिनिटाने फोन आले होते. फोनमध्ये दाऊद असा उल्लेख करण्यात आला होता.2 कोटी रुपये द्या नाहीतर जीवे ठार मारू अशी धमकी फोनवरून देण्यात आली. या फोन कॉलनंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे धाव घेतली.
फोन कुठून आला, कुणी केला आणि का केला, याचा तपास पोलीस घेत आहे. सायबर पोलिसांची एक टीम सुद्धा पोहोचली आहे. हा फोन कुठून आला होता. याचा शोध घेतला जात आहे. सध्या पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले आहेत आणि चौकशी करत आहे. सध्या नितीन गडकरी सुद्धा हे नागपूरमध्येच आहे. त्यामुळे कार्यालय आणि निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Share This

titwala-news

Advertisement