ठाणे घोडबंदर रोडवर ऑईल टँकर उलटला,पातलीपाडा फ्लायओव्हरवर खळबळ...
डावीकडे वळण घेताना टँकर उलटल्याची घटना,वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन...
ठाणे :- ठाण्यातील घोडबंदर रोडवरील पातलीपाडा फ्लायओव्हर येथे ऑईल टँकर उलटल्याची घटना नुकतीच घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फ्लायओव्हरवरून डावीकडे वळण घेत असताना टँकरचा तोल जाऊन तो रस्त्यावर उलटला.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.दरम्यान,अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून,वाहनचालकांनी घटनास्थळाजवळून जाताना वेग कमी ठेवावा आणि सुरक्षित अंतर राखावे.