• Total Visitor ( 84714 )

पाणीवापर संस्थांचे बळकटीकरण आवश्यक

Raju Tapal February 12, 2022 34

पाणीवापर स़ंस्थांचे बळकटीकरण आवश्यक ; जलसंपदामंत्री जयंत पाटील

महाराष्ट्रातील पाणीवापर संस्थांना राज्य सरकारकडून पुरस्कार जाहीर
 
सिंचन व्यवस्थापनात पाणीवापर संस्थांचा सहभाग महत्वाचा असून राज्यातील पाणीवापर संस्थांचे बळकटीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.
जलसंपदा विभागाच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर येथे आयोजित महात्मा फुले पाणीवापर संस्था अभियान व त्याअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणीवापर संस्था व्यवस्थापन अभियांत्रिकी सेवेतील उत्कृष्ट अभियंता पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
जलसंपदा विभागाचे विशेष कार्य कारी अधिकारी विजयकुमार गौतम , सचिव विलास राजपूत पुणे विभागाचे मुख्य अभियंता ह.वि.गुणाले यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम म्हणाले, सिंचन क्षेत्रात पाणीवापर संस्था व अभियंता यांचा समन्वय अत्यंत महत्वाचा आहे. सिंचन क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव होण्यासोबतच इतरांना प्रेरणा मिळावी यासाठीच ही पुरस्कार योजना आहे.
महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्याअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणीवापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार याप्रमाणे :-
सन २०१४-१५ राज्यस्तरीय पुरस्कार :-
प्रथम - कृषी देवता कालवा पाणी वापर संस्था गुनवडी ता.बारामती जि.पुणे
द्वितीय - संत कदम माऊली पाणी वापर संस्था पाथरे ता.राहुरी जि.अहमदनगर
तृतीय - बागाईतदार पाणीवापर संस्था आराई ता.बागलाण जि.नाशिक
     सन २०१४ - १५ विभाग नाशिक
प्रथम - जय बजरंग पाणी वापर संस्था जानोरी ता.दिंडोरी जि.नाशिक
द्वितीय - श्री समर्थ पाणी वापर संस्था मोहाडी ता.दिंडोरी जि.नाशिक
      सन २०१४- १५ विभाग पुणे
  प्रथम - श्री.गुरूनाथ पाणी वापर संस्था क्रमांक ३७ वडनेर खुर्द जांबूत ता.शिरूर जि.पुणे
द्वितीय - श्री.खांडेश्वरी पाणी वापर संस्था मर्यादित खांडज ता.बारामती जि.पुणे
      सन २०१४-१५ विभाग अमरावती
  प्रथम - अंब्राजीबाबा पाणी वापर संस्था परसापूर ता. अचलपूर जि.अमरावती
द्वितीय - जय किसान पाणी वापर संस्था परसापूर
  सन २०१४-१५ विभाग नागपूर
प्रथम - गजानन पाणी वापर संस्था बोंडगाव / तूट ता.अर्जुनी जि.गोंदिया
द्वितीय - माँ गंगा पाणी वापर संस्था अरततोंडी अरूणनगर ता.अर्जुनी जि.गोंदिया
  सन २०१४-१५ विभाग औरंगाबाद
 प्रथम - जलस्वराज्य पाणी वापर संस्था बारड ता. मुदखेड जि.नांदेड
द्वितीय - मुक्तागिरी पाणी वापर संस्था देळूब ता. अर्धापूर जि.नांदेड
सन २०१४ - १५ विभाग कोकण
 प्रथम - गंगेश्वर पाणी वापर संस्था शिरगाव ता. देवगड जि.सिंधुदुर्ग
द्वितीय - लिंगेश्वर पावणादेवी पाणीवापर संस्था निळेली ता. कुडाळ जि.सिंधुदुर्ग
सन २०१७ - १८ करिता मोठे प्रकल्प राज्यस्तरीय पुरस्कार
प्रथम - जानुबाई पाणीवापर संस्था शिरवली ता.बारामती जि.पुणे
द्वितीय - ज्योतिर्लिंग पाणी वापर संस्था ता.बारामती जि.पुणे
 तृतीय - वारेगाव ग्रुप उपसा जलसिंच सहकारी पाणी वापर संस्था ता.सिन्नर जि.नाशिक
सन २०१७ - १८ कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पुरस्कार
   प्रथम - पेनटाकळी प्रकल्प पाणीवापर संस्था संघ मेहकर जि.बुलढाणा
सन २०१८ - १९ करिता मोठे प्रकल्प पुरस्कार
प्रथम - केशवराज पाणी वापर संस्था अन्वी मिर्झापूर जि.अकोला
सन २०१८ -१९ करिता मध्यम प्रकल्प
प्रथम - के. रंगनाथ गोपाळ पाटील पाणी वापर संस्था वलखेड ता.दिंडोरी जि.नाशिक

Share This

titwala-news

Advertisement