पाटस येथे ५० लाखांचा गांजा जप्त
पुणे - सोलापूर महामार्गावरील पाटस ता.दौंड येथे यवत पोलीसांनी गांजा तस्करी करणारी टोळी पकडून ५० लाखांचा गांजा जप्त केला..
पाटस गावच्या हद्दीत मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास एक मालवाहू ट्रक ताब्यात घेवून ट्रकची तपासणी केल्यानंतर सुमारे ५० लाखांचा गांजा आढळून आला.
याप्रकरणी १० पेक्षा जास्त आरोपींना यवत पोलीसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पकडण्यात आलेला गांजा पुणे जिल्ह्यातील काही दुकानात व मुंबईत विक्रीसाठी आणण्यात आला होता असा संशय पोलीसांना असल्याचे असे समजते.