डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी वाढीव जागेचा मार्ग मोकळा!
कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण करण्यासाठी वाढीव जागा उपलब्ध करून देण्याबाबत विधानभवन येथील उपाध्यक्ष कार्यालयाच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. स्मार्ट सिटीच्या रस्ता रुंदीकरणात उद्यानाची सुमारे २७ गुंठे जागा गेल्याने,उद्यानाच्या विकासासाठी वाढीव जागा मिळावी,अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत सकारात्मक भूमिका घेत उद्यानालगतची सुमारे २ एकर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षण बदलाचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावा,असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष मा. अण्णा बनसोडे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला दिले. बैठकीस नगरविकास विभागाचे अधिकारी,कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त,नगररचना अधिकारी तसेच आंबेडकरी चळवळीतील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.