यांचे चक्रव्यूह यापुढे जनताच भेदणार
Raju tapal
November 04, 2024
10
यांचे चक्रव्यूह यापुढे जनताच भेदणार!
कठीण परिस्थितीतही शेवटी विजय माझाच!!विशाल परब
सिंधुदूर्ग:-आज हजारो वर्षानंतरही कोवळ्या वयातला तो अभिमन्यू लोकांच्या स्मृतीत आहे तो त्याच्या लढण्यामुळेच! महाभारतात त्यावेळच्या नावाजलेल्या एकेका रणधुरंदर योद्धांनी त्याला पराभूत करण्यासाठी भक्कम चक्रव्यूह रचला, पण ते त्या अभिमन्यूची नैतिकता, शौर्य आणि हिंमत युगानुयुगे नाकारू शकले नाहीत!
त्याप्रसंगी अभिमन्यूचा पराभव झाला कारण योग्यवेळी सैन्याची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहू शकली नाही! आज परिस्थिती तेवढ्या अर्थाने नक्कीच वेगळी आहे की मला एकटे पाडण्यासाठी काही राजकीय पक्ष आणि इथले प्रस्थापित सत्ताधारी एकवटले असले तरीही...
जनता माझ्या सोबत आहे! भक्कमपणे आहे!! योग्य वेळी योग्य निर्णय घेत परिवर्तन करण्याच्या पुर्ण मूडमध्ये आज जनता आहे!!
म्हणूनच कितीही ताकद लावली, दहशत माजवली आणि दबाव आणला तरीही....
लोकही आपल्यासोबत! कार्यकर्तेही आपल्यासोबतच! म्हणून.. विजय आपलाच! जनतेच्या मनातला "विशाल" विजय आता निश्चित!!
Share This