जि.प.अमरावती अंतर्गत शालेय विद्यार्थी क्रीडा स्पर्धेची नियोजन सभा संपन्न
जिल्हास्तरीय प्राथमिक शिक्षक संघटना पदाधिकारी यांची उपस्थिती
केंद्र,बीट,तालुका तथा जिल्हास्तरीय प्राथमिक विद्यार्थी क्रीडा स्पर्धाचे नियोजन सभा मंगळवार दि.१०डीसेंबरला जिल्हा परीषद कन्या शाळा अमरावती येथे जिल्हास्तरीय प्राथमिक शिक्षक संघटनेची सभा प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने,दिपक कोकतरे,शिक्षण विस्तार अधिकारी प्रविण खांडेकर,असफाक सर,सर्व गटशिक्षणाधिकारी,विनय देशमुख,विषय तंज्ञ राजेश नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या क्रीडा महोत्सवात प्राथमिक गट सांघिक खेळ ८,वैयक्तिक खेळ ४तर माध्यमिक गट सांघिक खेळ ९व माध्यमिक गट ११खेळ असे ३२खेळाचा सहभाग राहणार आहे.जिल्हास्तरीय स्पर्धा १५जानेवारी पर्यंत घेण्याचे ठरविण्यात आले.तसेच या स्पर्धा पारपाडण्या करीता विविध समित्या तयार करण्यात आला.यामध्ये नियंञण समिती,कार्यालयीन समिती,निवास समिती,मैदान समिती,भोजन,स्वागत,पाणी व स्वच्छता,बक्षिस,नोंदणी,लेखा,प्रसिध्दी,छायाचिञण,निर्णय,सांस्कृतिक कार्यक्रम व आरोग्य समिती स्थापन करण्यात येणार आहे.
क्रीडा प्रकारा मध्ये प्राथमिक विभाग सांघिक खेळ कबड्डी,खो-खो वैयक्तिक खेळ मध्ये लंगडी,७५मी.धावणे,लांब व उंच उडी,दोरीवरील उड्या याचा समावेश असुन माध्यमिक विभाग सांघिक खेळ कबड्डी,खो-खो,व्हाॅलीबाॅल,टेनिक्वाइड,दुहेरी,बॅडमिंटन दुहेरी,१००x४रिले,वैयक्तीक खेळ मध्ये १००मी.धावणे,लांब व उंच उडी,कुस्ती,गोळा फेक,टेनिक्वाइड मुली याचा समावेश आहे.
सभेला शिक्षक संघटनेचे सुनिल केने,गजानन देवके,सुरेन्द्र मेटे,राजकुमार खर्चान,अजयानंद पवार,शैलेश दहातोंडे,राजाभाऊ राजनकर,जावेद जौहर,शहजाद अहमद,संजय कोकाटे,अर्जुन मानापूरे,राजेंद्र गावंडे,गजानन चौधरी,सुभाष सहारे,मंगेश खेरडे,राजेश सावरकर,सुभाष बेंडे,बाळासाहेब मुंदे,ज्ञानेश्वर घोडेस्वार,शहजाद अहमद,मनोज चौरपगार,अजय साव,गणेश भगत,गजानन कळंबे,राजेन्द्र दिक्षित,किशोर मालोकार,राजकुमार गायकी,अब्दुल राजिक,वसिम फरहत,उमेश वाघ,शैलेश चौकसे,सुरेश चिमणकर,सै.अहमद अली,दादाराव भोवळे,राजेश गाडे,रामेश्वर स्वर्गीय,तेजकुमार गुडघे,महेंद्र हिवे,गोकुल चारथळ,देवराव अमोदे उपस्थित होते.