पोलीस असल्याची बतावणी करून सोनसाखळी लंपास ; बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील को-हाळे खुर्द रस्त्यावरील घटना
-------------------
पोलीस असल्याची बतावणी करत जेष्ठाकडील सोनसाखळी हातचलाखीने लंपास केल्याची घटना बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील को-हाळे खुर्द रस्त्यावर गुरूवारी दि.१७ फेब्रुवारीला घडली.
शासकीय खात्यातून निवृत्त झालेले सावता नामदेव हिरवे वय - ६६ रा.वडगाव निंबाळकर हे गुरूवारी दुपारी वडगाव निंबाळकर -को-हाळे खुर्द रस्त्यावर असताना डोक्यावर टोपी, खाकी रंगाची पँट परिधान केलेली एक व्यक्ती तेथे दुचाकीवरून तेथे आली त्याने पोलीस असल्याची बतावणी केली.
त्यांच्याकडील तीन तोळे वजनाघी सोन्याची साखळी काढून ठेवण्यास सांगत हातचलाखीने ती लंपास केली.
सहाय्यक प़ोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे या घटनेचा तपास करत आहेत.