व्यापारानिमित्त लातुरमध्ये गेलेल्या पुण्याच्या एका व्यापा-याला लुटल्याची घटना घडली.
याबाबत लातूर येथील गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी रामेश्वर उर्फ पाप्या सूर्यकांत बजगुडे वय - २० रा.औसा रोड लातूर याच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकीसह साडेपाच लाखांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुणे येथील व्यापारी रिकेश चंपालालजी सोनी वय - ३२ रा.कोंढवा पुणे हे व्यापारानिमित्त लातुरात गेले होते.
व्यवहारातील काही रक्कम सोन्याचे दागिने ,रोख रक्कम २५ हजार बॅग मध्ये ठेवत मुक्कामासाठी लॉजकडे पायी निघाले. रात्रीच्या सुमारास कामदार रोड येथे अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याजवळील रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत झटापट सुरू केली.
हिसका मारत फिर्यादीच्या पाठीवर असलेली दागिन्यांची, रोख रकमेची बॅग अनोळखी व्यक्तींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत झटापट करत हिसका मारून बॅग पळवून नेली.
याबाबत गांधी चौक लातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी रामेश्वर उर्फ पाप्या सूर्यकांत बजगुडे याच्यासह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
२३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सूनावली.