एस टी प्रशासनाने खासगी वाहनांना प्रवासी वाहतूकीची मान्यता दिल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यातील स्वारगेट एस टी स्थानकावर कर्मचा-यांनी जागरण गोंधळ आंदोलन केले.
राज्य सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा आणि आमचे विलिनीकरण करावे अशी मागणी आंदोलकांकरून जोर धरू लागली आहे.
शासनाच्या अधिसुचनेच्या अधिन राहून पुणे शहरातील एस टी बसस्थानकांतून खाजगी बसेसद्वारे सकाळी ६ वाजल्यापासून प्रवासी वाहतूकीचे नियोजन करण्यात आलेले आहे. खाजगी बस वाहतूकदारांनी एस टी प्रशासनाकडून सध्याच्या एस टी च्या प्रचलित भाडेदरांप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारण्याच्या सुचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.