लोणीकंद ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सागर कंद
फुलगाव (गौतम पाटोळे):- हवेली तालुक्यातील लोणीकंद ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सागर बबन कंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरपंच सुप्रिया जय कंद यांनी राजीनामा दिल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरावणे यांनी याबाबत माहिती दिली. नियुक्तीनंतर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सागर कंद यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नारायण कंद,माजी सरपंच श्रीकांत कंद,गजानन कंद,गंगाधर दळवी,विशाल कंद,सुनील कंद गोपीनाथ कंद,शहाजी शिंदे,यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.