• Total Visitor ( 84793 )

साई एकविरा स्पोर्टस मोहीली कडून नगरसेवक किक्रेट सामने सुरू

Raju Tapal December 16, 2021 110

साई एकविरा स्पोर्टस मोहीली कडून नगरसेवक किक्रेट सामने  सुरू


साई एकविरा स्पोर्टस मोहीली कडून सन 2021- 2022 नगरसेवक किक्रेट चषकाचे आयोजन 16 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत सुवर्ण शिल मैदान बल्याणी मोहीली येथे करण्यात आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या हस्ते नगरसेवक क्रिकेट चषकाचे उदघाटन करण्यात आले. उदघाटनचा पहिला सामना गावदेवी किक्रेट संघ नादंप व आपटी बी यांच्या मध्ये झाला. उदघाटन समयी माजी नगरसेवक मयूर पाटील, किसन महात्रे,भरत मढवी, महेश पाटील, तसेच साई एकविरा स्पोर्टसचे जिवन गोंधळे, रोशन अंबारे, प्रेम शिंगोले उपस्थित होते.

सदरील नगरसेवक चषकांच्या सामन्यांमुळे चार दिवस क्रिकेटची मेजवानी मोहीली बल्याणीकरांना बघायला मिळणार आहे.
 रविवारी अंतिम सामने व बक्षीस सभांरभ होणार आहे.
एकूण 32 संघ सहभागी होणार आहेत तसेच यावेळी विश्वनाथ शिंगोले, सुनील पाटील, जनार्दन पाटील, सुदाम पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली.

Share This

titwala-news

Advertisement