• Total Visitor ( 134345 )

माध्यमिकचे शिक्षक घेत आहे क्षमतावृध्दीचे धडे

Raju tapal March 20, 2025 32

माध्यमिकचे शिक्षक घेत आहे क्षमतावृध्दीचे धडे !

जि.प,माध्यमिक कन्या शाळा (गल्स )हायस्कृल अमरावती येथे भातकुली तालुकास्तरीय प्रशिक्षनाचा ४ टप्पा सुरुवात

८ मार्गदर्शक व ९० प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग

अमरावती,ता.२० :- राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी संपूर्ण देशभरात विविध टप्यावर करण्यात येत आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रामध्ये हे धोरण पूर्णपणे लागू करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ५ दिवसीय तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण १० ते १४ फेब्रुवारी २०२५ला पहीला टप्पा,१७ते२१फेब्रुवारी दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा २४ते२८फेब्रुवारी २०२५ व चौथा टप्पा १८ते २२ मार्च दरम्यान जि.प.माध्यमिक कन्या शाळा कॅम्प अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे.

तालुकास्तरीय प्रशिक्षणात ८ तज्ज्ञ मार्गदर्शक तालुक्यातील ९० माध्यमिक प्रशिक्षणार्थिना सध्या प्रशिक्षण देत आहे. यात जिल्हा परिषदेचे व खासगी माध्यमिक  शिक्षकांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी हे तालुकास्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करीत आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील महत्वाचे बदल पोहोचविण्याचे काम केले जाणार आहे. या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, क्षमता आधारित मूल्यांकन आराखडा, क्षमता आधारित मूल्यांकन कार्यनिती, क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्ये, विचार प्रवर्तक प्रश्न, समग्र प्रगतीपत्रक इत्यादी विषयावर हे प्रशिक्षण दिले जात आहे.

गटशिक्षणाधिकारी दिपक कोकतरे यांच्या मार्गदर्शनात चंद्रकांत कडवे हे या प्रशिक्षणाची समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. 
तालुकास्तरीय प्रशिक्षणात,पंकज हिरोडे,श्वेता पांडे,निलेश चाफलेकर,सुनिल ढोणे,संजय गेडाम,राजेन्द्र ठाकरे,भावना खांडे,संदिप भटकर,हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावत आहे. तर, गटासाधन केंद्राचे चंद्रकांन्त कडवे सहकार्य करीत आहे.

तालुक्यातील सर्वच शिक्षकांना प्रशिक्षण मिळणार

तालुक्यात चार टप्प्यात हे पाच दिवसीय प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्वच शिक्षकांचा सहभाग राहणार आहे. तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील ३३६ शिक्षकांना तिन टप्प्यात तालुका स्तरावर हे प्रशिक्षण दिले आहे.आता शेवटचा चौथा टप्पा ९० माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे गटशिक्षणाधिकारी दिपक कोकतरे यांनी सांगितले.

 

Share This

titwala-news

Advertisement