• Total Visitor ( 446598 )
News photo

विदर्भातील जेष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन 

Raju Tapal publisher March 23, 2026 20

विदर्भातील जेष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन 

        

शिक्रापूर:- विदर्भातील जेष्ठ नेते,शिक्षणतज्ज्ञ दत्ता मेघे यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. गरिब परिस्थितीतून पुढे आलेल्या दत्ता मेघे यांनी सौम्य,मृदू भाषेमुळे विदर्भातील राजकारणात महत्वाचे स्थान प्राप्त केले होते. आपल्या कारकीर्दीची सुरूवात त्यांनी काॅंग्रेस पक्षात केली. ते काॅंग्रेसचे जेष्ठ नेते होते. वर्धा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी ४ वेळा प्रतिनिधित्व केले होते. लोकसभेसह राज्यसभेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.ते ३ वेळा विधानपरिषदेचेही सदस्य होते. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.त्यापूर्वी १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वातील पुलोद सरकारमध्ये विदर्भातून मंत्री होते. अनेक वर्षी मंत्री,विरोधी पक्षनेता अशी पदे भुषवित‌ १९९१ मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून काॅंग्रेस चे उमेदवार म्हणून त्यांनी विजय संपादन केला होता. रामटेक व वर्धा या मतदारसंघातून खासदार म्हणून ते निवडून आले होते. वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था त्यांनी उभ्या केल्या आहेत.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement