शासकीय कामात अडथळा एकावर गुन्हा दाखल
Raju Tapal
December 20, 2021
44
शासकीय कामात अडथळा आणून ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचे कामकाज बंद पाडल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये एकावर गुन्हा दाखल
शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचे कामकाज चालू असताना महिला ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने गोंथळ घालून ग्रामपंचायत सरपंचाला शिविगाळ, दमदाटी करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा आणून मासिक सभेचे कामकाज बंद पाडल्याप्रकरणी मच्छिंद्र मुरलीधर धुमाळ यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील ग्रामपंचायतीची मासिक सभा १७/१२/२०२१ रोजी सुरू असताना सरपंच अशोक गोरडे यांनी गावातील गायरान जमिनीमध्ये सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षारोपणाची मागणी केली असल्याने त्याबाबत चर्चा सुरू होती.
ग्रामपंचायत सदस्या रूपाली धुमाळ यांचे पती मच्छिंद्र धुमाळ यांनी सभेमध्ये कोणतीही परवानगी न घेता उठून सभेचा अनादर केला.
यावेळी सरपंच अशोक गोरडे त्यांना समजावून सांगत असताना धुमाळ यांनी सरपंच गोरडे यांना शिविगाळ, दमदाटी करत अचानक हाताने मारहाण केली.मी तुला खोट्या गुन्ह्यात अडकवितो अशी धमकी देत गोंधळ घालून ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामविकास अधिकारी हे करत असलेले मासिक सभेचे कामकाज बंद पाडले.
याबाबत मोराची चिंचोली गावचे सरपंच अशोक अशोक ठकूजी गोरडे वय - ६१ रा.मोराची चिंचोली, शास्ताबाद ता.शिरूर यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. शिरूर पोलीसांनी मच्छिंद्र मुरलीधर धुमाळ रा.मोराची चिंचोली, शास्ताबाद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पुढील तपास करत आहेत.
Share This