महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा पुणे मार्फत मौजे शिक्रापूर येथे श्री दिलीप धर्माजी वाबळे यांच्या शेतावर सेंद्रिय शेतीशाळाचे गुरूवार दि.२५ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजन करण्यात आले होते. शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना एकात्मिक कीड ,रोग व्यवस्थापन फेरोमन ट्रॅप चा वापर ,दशपर्णी अर्क तयार करणे, निबोळी अर्क तयार करणे, जीवामृत तयार करणे, वेस्ट डी कॉम्पोजेर तयार करणे, पिवळे,निळे चिकट सापळे,पक्षी थांबे, मित्र व शत्रू किडीची ओळख, हिरवळीच्या खताचा वापर, जीवाणू खताचा वापर, गांडूळ खताचा वापर, पिकाची फेरपालट , शेणखताचा वापर, कंपोष्ट खताचा वापर, कारखान्याची मळीचा वापर, पाचट कुट्टी व आच्छादन मल्चिंग करणे ह्यामुळे ताणाचा बंदोबस्त होतो . ठिबक सिंचन चा वापर. सर्वात महत्वाचे म्हणजे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला माल विक्री,प्रक्रिया करणे. या सर्व गोष्टीचा या शेतीशाळेत विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
शेतीशाळेत विभागाचे उपविभागीय कृषि अधिकारी श्री मनोजकुमार ढगे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व विषद केले. कोरोना सारख्या महामारीमध्ये सेंद्रिय विषमुक्त भाजीपाला व अन्नधान्य खाणे व विक्री करणे गरजेचे आहे.अति रासायनिक खते व किटक नाशकाच्या फवारणी मुळे कॅन्सर सारखे आजार होत आहे.त्यासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज बनलेली आहे. विकेल ते पिकेल ह्या धर्तीवर शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्था बळकट केली पाहिजे जसे काही अँप विकसीत करून मागणी नोदवून व विविध गृहनिर्माण सोसायटीना भाजीपाला व अन्नधान्य विक्री करून विक्री व्यवस्था भक्कम करून शेतकऱ्याची आर्थिक नियोजन कमी खर्चात जास्त नफा मिळविले पाहिजे. शेतकरी प्रक्रिया उद्योगाकडे वळले पाहिजे PMFME सारख्या योजनेत सहभागी होऊन लाभ घेतला पाहिजे व शेती मालावर प्रक्रिया करून उद्योजक शेतकरी बनले पाहिजे असे प्रतिपादन केले.
तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी श्री सिद्धेश ढवळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये फळपिक व प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजना व निर्यातक्षम फळे व भाजीपाला याची अपेडा वर नोंद करणे. तसेच कृषि यांत्रिकीकरण,ठिबक सिचन ,मल्चींग अशा विविध योजनाची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली.
कृषि विभागाचे विविध रिसोर्स पर्सन श्री दिलीप धर्माजी वाबळे - शिक्रापूर सेंद्रिय फळबाग व भाजीपाला ,
श्री भगवान दामुजी रासकर - कासारी फळे विषमुक्त व विक्री व्यवस्था नियोजन,
सौ.नंदा पांडुरंग भुजबळ – शिक्रापूर, कृषि कन्या सेंद्रिय महिला बचत गट सेंद्रिय कडधान्य व तयार विना पालीश डाळ उत्पादन ,
श्री विजित शिवाजीराव मांढरे – शिवराज ऑर्गनिक फार्म्स अँन्ड प्रॉडक्ट्स चाकण रोड शिक्रापूर,
श्री सुर्यकांत शिर्के सर किसान संघ महाराष्ट्र, श्री गीताराम कदम न्हावरा यांनी आपल्या शेतात केलेले सेंद्रिय शेतीचे प्रयोग व माहिती उपस्थित शेतक-यांना दिली.श्री विजित मांढरे यानी भाजीपाला बास्केट विक्री पद्धत व सेंद्रिय भाजीपाला उत्पादन याविषयी मार्गदर्शन केले व सेंद्रिय भाजीपाला बास्केट मान्यवरांना भेट दिली.
शेतीशाळा कार्यक्रमा मध्ये गोल्डन फ्युचर कंपनी श्री सुनील पवार श्री प्रवीण पाटील श्री सर्वेश सन्नी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.हरिता कंपनीचे प्रतिनिधी अनिकेत अडसूळ नेटाफिन ठिबक कंपनी चे कृषि तज्ज्ञ पंकज पवार व विठ्ठल चिनके धरतीपुत्र कंपनीचे आनंद पटवारी यशोवार्धी फार्मर कंपनी चे तानाजी दरेकर माजी पंचायत समिती सदस्य दिपाली ताई शेळके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि सहाय्यक अशोकराव जाधव यांनी केले व बी टी एम आत्मा शिरूर अविनाश निर्मल यांनी आभार मानले तसेच कृषि पर्यवेक्षक सुनील मोरे कृषि सहाय्यक श्रीमती जयश्री रासकर, सुभाष सुतार ,नवज्योत आगे यांनी सहकार्य केले.कृषि मित्र तानाजी राऊत प्रगतशील शेतकरी कैलास मांढरे ,किशोर मांढरे ,अंकुश हिरवे, महादेव गायकवाड,दिनकर गिलबिले, भाऊसाहेब केवटे, सुदर्शन डोमाळे कार्यक्रमाला उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी शिक्रापूर श्री अशोकराव जाधव यांनी शेतीशाळा आयोजन करण्याचे ठरविले.