शिरसाई मंदीरातील चोरीप्रकरणी तिघांना अटक ; शिर्सुफळ ता.बारामती येथील घटना
शिर्सुफळ ता.बारामती येथील प्रसिद्ध शिरसाई देवी मंदीरातील चोरीप्रकरणी बारामती तालुका पोलीसांनी तिघांना ताब्यात घेवून अटक केली. शाहरूक राजू पठाण वय - २४ रा. गोकूळ शिरगाव कोल्हापूर, मुळगाव शिवतक्रारवाडी निरा ता.पुरंदर जि.पुणे , पुजा जयदेव मदनाळ वय - १९ रा. गोकूळ शिरगाव कोल्हापूर मूळ रा.जुनाबिडी कुंभारी, सोलापूर, अनिता गोविंद गजाकोश वय १९ रा.गोकूळ शिरगाव कोल्हापूर, मूळ रा. गोलघुमट,शिवाजी चौक,विजापूर, कर्नाटक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शिरसाई मंदीरात शनिवारी दि.८ जानेवारी २०२२ रोजी रात्री १ ते पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान चोरी झाली होती. देवीच्या दागिन्यांसह पितळी समया, पणत्या असा १५ लाख रूपयांचा ऐवज चोरीला गेला होता. वैभव विश्वनाथ क्षीरसागर या पुजा-याने चोरीबाबत फिर्याद दाखल केली होती. देवीच्या मंदीरात चोरी झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. आरोपी शाहरूख व पुजा हे पती पत्नी असून अनिता ही शाहरूख याची मेहुणी आहे. बारामती तालुका पोलीसांनी आरोपींना शिरगाव ता.करवीर जि.कोल्हापूर येथून आरोपींना घेतले.