शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर भरदुपारी दरोडा ;
Raju Tapal
October 22, 2021
36
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर भरदुपारी दरोडा ; दोन कोटी रूपये किंमतीच्या सोन्यासह 30 लाखांची रोकड लंपास
शिरूर तालूक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर आज गुरूवारी २१ ऑक्टोबर ला भरदुपारी पाच ते सहा जणांच्या टोळीने दरोडा टाकला.
दरोडेखोरांच्या टोळीने शस्त्राचा धाक दाखवून बँकेतून ३१ लाख रूपयांसह सुमारे २ कोटी रूपयांचे सोने चोरून नेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे काम आज सुरळीतपणे सुरू असताना दुपारी एका मोटारीतून पाच ते सहा जणांची हत्यारबंद टोळी बँकेत शिरली. त्यातील एक दरोडेखोर बँकेच्या दरवाजात उभा राहिला. बाकीच्यांनी बँकेत जावून अधिकारी व ग्राहकांना शस्त्राचा धाक दाखविला. त्यांच्या हातात पिस्तूल होते. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत बँकेतून रोख ३१ लाख रूपये व दोन कोटी रूपये किंमतीचे सोने लुटून दरोडेखोर नगरच्या दिशेने पळून गेले.
दरोडेखोर २५ ते ३० वर्षे वयोगटातील असल्याचे सांगण्यात येत असून शिरूर पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
Share This