• Total Visitor ( 435859 )
News photo

वंदे मातरम् गीताच्या गायनाने शिरूर दुमदुमले

Raju tapal November 07, 2025 79

वंदे मातरम् गीताच्या गायनाने शिरूर दुमदुमले



    

शिक्रापूर (प्रतिनिधी):- वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर हजारो विद्यार्थ्या़च्या उपस्थितीत वंदे मातरम् गीताच्या सर्व कडव्यांचे‌ गायन करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या वंदे मातरम्,भारत माता की जय या देशभक्तीपर घोषणांनी शिरूर परिसर दुमदुमून गेला .बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त शिरूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर या कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले आयुष्य अर्पण केले आहे.भारत देश आत्मनिर्भर आणि स्वावलंबी कसा बनेल यांचा विचार युवकांनी करावा असे विचार प्राचार्य डॉ.के.सी.मोहिते यांनी यावेळी व्यक्त केले. हे गीत स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारे ठरेल असे सांगून  प्रमुख वक्ते प्रशांत अवचट यावेळी बोलताना म्हणाले,या गीतातून एकात्मतेचा संदेश दिला जातो. विजयमाला विद्यामंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात देशभक्तीपर नाटिका सादर केली. विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात देशभक्तीपर गीते सादर केली. सहाय्यक गटविकास अधिकारी जयराम लहामटे‌ विस्तार अधिकारी किसन खोडदे,समिती सदस्य विठ्ठल वाघ,प्रा.सतिशराव धुमाळ,संजय पारडे,अर्जून खराबे,दिनकर जाधव,बापुराव मोहर,प्राचार्य संजय मचाले‌,स्नेहल शिंदे,अण्णासाहेब सरोदे या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रा.यशस्विता वारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.अमित परदेशी यांनी आभार मानले.

          


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement