• Total Visitor ( 428946 )
News photo

जिल्हा परिषद अमरावती मध्ये शिव स्वराज्य दिन साजरा

Raju tapal June 07, 2025 72

जिल्हा परिषद अमरावती मध्ये शिव स्वराज्य दिन साजरा



मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापाञ यांच्या हस्ते पुतळा पुजन व ध्वजारोहन



अमरावती :- दि.६जुन२०२५ ला जिल्हा परिषद अमरावती येथे शिव स्वराज्य दिनानिमित्त जि.प.अमरावती च्या प्रांगणात मा.मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र मॅडम (भाप्रसे) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन व हारार्पण करुन अभिवादन केले.व भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन अभिवादन करण्यात आले.त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करण्यात आले.

   मा.संजीता महापात्र मॅडम (भाप्रसे) यांनी सर्वांना शुभेच्छा देवून आपल्या मनोगत म्हणाल्या की,"आज शिवराज्याभिषेक दिन हा प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा दिवस आहे,इतके वर्षापासुन महाराष्ट्र मध्ये काम करीत असतांना शिवाजी महाराजांबाबत त्यांचे गौरव ऐकत आहे त्यामुळे मला खुप अभिमान वाटते की,शिवाजी महाराजांच्या इतिहासाखाली काम करीत आहे"असे गौरवशाली उदगार केले.तसेच त्यांनी,"आपण कुठलाही ऐतिहासिक क्षण साजरा करतो त्यामागे उद्देश काय असतो? की आपण आपला इतिहास विसरु नये." तसेच,"शिवाजी महाराज यांनी स्वत:ला कधीही राजासारखे बघितले नसुन,प्रजेची सेवा करण्यासाठी ते तक्तवर बसले होते त्याचप्रमाणे आपण अधिकारी, कर्मचारी यांनी खुर्चीवर असतांना आपण एक पब्लिक सर्वन्टं म्हणुन बसायला पाहिजे ना की पब्लिक आँफीसर म्हणुन.प्रत्येकांनी सेवा करतांना पारदर्शकता,निरपेक्षकता सेवाभाव असायला पाहीजे,"छत्रपती शिवाजी महाराजांचे ईतके वर्ष राज्य होते त्यामधुन खुप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत,त्यामधील गोष्टीचे अनुकरण नक्की करावे,"असे आवाहन करून प्रतिपादन केले.

    यावेळी प्रकल्प संचालक प्रितीताई देशमुख, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी हेमंत ठाकरे,उप मुकाअ(पावस्व)संजय खारकर,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.पुरुषोत्तम सोळंके,शिक्षणाधिकारी(माध्य) प्रियाताई देशमुख मॅडम, खाते प्रमुख जिप प्रामुख्याने सोहळ्याला उपस्थित होते.यावेळी गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे यांचे नेतृत्वात जि.प.मुलींचे हायस्कुल अमरावती येथिल एनसीसी च्या विद्यार्थीनींनी प्रमुख अतिथी यांना बँन्ड पथकाच्या गजरात परेड करुन मानवंदना दिले.या सोहळ्याला स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर घाटे,निलेश तालन,पंकज गुल्हाने,नितिन माहोरे,श्रीकांत मेश्राम,परमेश्वर राठोड,हेमंतकुमार यावले,विजय कविटकर,सुजीत गावंडे,सतिश पवार,अविनाश गावंडे,गजानन पाचपोर विशाल विघे,जीवन नारे,बाळकृष्ण आंधळे,दिनेश तांबडे,दिनेश राऊत,अर्चना मानकर,अर्पणा आत्राम,पंकज गोरले,रजनी मस्के,देवेंद्र दुबळे,आदित्य तायडे,निशांत तायडे,शरद चहाकार,मनिषा अंधारे,परिक्षित बाराहाते,गजानन जुनघरे,सचिन गायगोले इ.जिपचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.असे राजेश सावरकर यांनी कळविले आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement