शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
Raju Tapal
November 15, 2021
42
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सोमवार दि.१५/११/२०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी निधन झाले.
गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दिनानाथ रूग्णालयात उपचार सुरू होते. रूग्णालयातच त्यांनी ९९ वर्षी अखेरचा श्वास घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
वृद्धापकाळाने बाबासाहेब पुरंदरे यांना न्युमोनियाची लागण झाली होती.
शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहीरांनी आयुष्यभर जपला. या मंत्राच्या साहाय्याने वन्ही तो चेतवावा ! चेतवितो चेततो ! या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ दूर केली.
बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे . पुण्याजवळील सासवड मध्ये २९ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरू केले. २०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर १२ हजारांंहून अधिक व्याख्याने दिली. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा ,मराठी साम्राज्य, ,शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.
बाबासाहेब पुरंदरे यांनी ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन नाट्यलेखन, जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले.त्यांना २०१५ साली महाराष्ट्र भूषण, २०१९ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले. हे नाटक हिंदी इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले. जाणता राजा या नाटकात १५० कलावंत काम करतात.
या नाटकामध्ये हत्ती घोडेही असतात.
शिवाजी महाराज लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या भक्तीचा विषय होते. ६ व्या वर्षांपासून वडिलांच्या बरोबर त्यांनी किल्ले, वाडे, महाल ,मंदीरे पाहाण्यास ष्रारंभ केला. इतिहासाचे साक्षीदार शोधण्यासाठी कधी सायकलवरून कधी पायी, कधी रेल्वेने,कधी जलमार्गाने कधी विमानाने, कधी बैलगाडीने कधी घोडेस्वारीपर्यत मिळेल त्या वाहनाने लक्षावधी मैलांचा बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रवास केला.
रात्रभर दफ्तरे चाळून शिवचरित्राची सामग्री मिळवली शिवचरित्र लिहून तयार झाले . पण ते प्रकाशित करण्यासाठी जवळ पैसे नव्हते. पैसे जमवायला बाबासाहेबांनी मुंबईच्या भाजीबाजारात कोथिंबीरही विकली.
Share This