सौर ऊर्जा क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची उत्तुंग भरारी !
महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या नेतृत्वाखाली व शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील एक वर्षात महापालिकेने १ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती करणारे प्रकल्प, विकासकांच्या सहभागातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात उभारलेले आहेत. अशा प्रकारे या क्षेत्रात काम करणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका देशभरातील एकमेव महानगरपालिका आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नविन इमारतीवर सौर ऊर्जा सयंत्रे उभारणे सन २००७ पासून बंधनकारक केलेले आहे. सौर ऊर्जा सयंत्रे उभारल्यानंतरच विकासक यांना इमारतीसाठी नगररचना विभागाकडून भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येते. *सन २००८ ते २०२१ या कालावधीत १८१९ इमारतींवर १,०७,९७,०८५ लिटर्स प्रतिदिन क्षमतेचे सौर उष्ण जल सयंत्रे विकासकाकडून उभारणी केलेली आहे.
सौर उष्ण जल सयंत्रे मुळे महापालिका क्षेत्रातील इमारतीमधील गरम पाणी करणेसाठी वीजेचा भार कमी झाला असून दरवर्षी १८ कोटी विज युनिटची बचत होत आहे.
सौर ऊर्जा वीज निर्मिती करणारे प्रकल्प उभारुन सौर ऊर्जा ह्या ग्रीन एनर्जी प्राधान्य देण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये नगरविकास विभागाने युनिफाईड विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमध्ये अंतर्भाव केलेला आहे.
मागील एक वर्षात महापालिका क्षेत्रात एकूण ६१ इमारतींवर एक मेगावॅट (१०००.५ किलो वॅट) क्षमतेची सौर ऊर्जा निर्माण करणारे प्रकल्प विकासकाकडून उभारणी करुन घेतलेले आहेत. सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पामुळे दरवर्षी १४,६०,००० वीज युनिटची निर्मिती होणार आहे. सदर वीज युनिट निर्मितीमुळे इमारतीसाठी आवश्यक उद्वाहन, वॉटर पंप, पॅसेज लाईट, आऊट डोअर लाईट या सामायिक बाबींसाठी आवश्यक वीजेची गरज त्यातून भागणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रात सौर ऊर्जा बाबत कल्याण डोंबिवली शहरातील नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विद्युत विभागाने पथनाट्य तयार केलेले आहे. आतापर्यंत सरकारी कार्यालये, शाळा व विविध ठिकाणी पथनाट्याचे २३ प्रयोग केलेले असून जनजागृतीचे काम सुरु राहणार आहे.
महापालिका क्षेत्रात नविन इमारतीवर सौर ऊर्जा सयंत्रे आस्थापित करुन घेणेसाठी विद्युत विभागाने प्रभावी कार्यपध्दती तयार केलेली असून या कामात विद्युत विभागातील सर्व अभियंता व विद्युत कर्मचारी यांचे सुध्दा योगदान आहे.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात महापालिका क्षेत्रातील नविन इमारतींवर २ मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा वीज निर्मिती करणारे प्रकल्प विकासकांच्या माध्यमातून उभारण्याचा विद्युत विभागाचा मानस आहे.* तसेच सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे. पथनाट्य माध्यमातून महापालिका क्षेत्रात सौर ऊर्जाबाबत जनजागृती विद्युत विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच *नविन आर्थिक वर्षात महापालिकेच्या १६ इमारतींवर सौर ऊर्जा वीज निर्मिती करणारे प्रकल्प बसविण्यात येणार आहेत अशी माहिती महापालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.