• Total Visitor ( 701338 )
News photo

सुमन कल्याणपूर यांचे निधन 

Raju Tapal publisher June 01, 2026 52

सुमन कल्याणपूर यांचे निधन 

 

पुणे :- जेष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी ३१ मे २०२६ रोजी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

२८ जानेवारी १९३७ रोजी जन्मलेल्या सुमन कल्याणपूर यांनी स्वतःच्या गायकीचा वेगळा,खणखणीत ठसा उमटवला होता. त्यांचा जन्म भवानीपूर ,बांग्लादेश येथे झाला होता. मराठी संगीतसृष्टीत त्यांचे पदार्पण महान कवी ग.दि.माडगूळकर यांच्या गीताने झाले.

"निंबोणीच्या झाडामागे", "अरे संसार संसार","केतकीच्या बनी तिथे नाचला मोर","रिमझिम झरती श्रावणधारा",यासारखी भावगीते ,भक्तीगीते त्यांनी गायिली. सुमन कल्याणपूर यांनी मराठीच नाही तर हिंदी,गुजराती,बंगाली भाषांमध्ये हजारो गाणी गायली.भारत सरकारने २०२३ मध्ये त्यांना पद्मभूषण सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026