• Total Visitor ( 702029 )
News photo

सविंदणे येथील शिक्षकाला बेदम मारहाण;विद्यार्थी,ग्रामस्थांचे आंदोलन 

Raju tapal February 27, 2026 105

सविंदणे येथील शिक्षकाला बेदम मारहाण;विद्यार्थी,ग्रामस्थांचे आंदोलन 

         

शिक्रापूर:- शिक्षकाला १२ जणांच्या टोळक्याने घरातून उचलून नेत लाथाबुक्क्यांनी तसेच काठ्यांनी बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनी बुधवारी दि.२५ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन केले. शिक्षकाला न्याय देण्याची मागणी आंदोलनकर्ते विद्यार्थी व ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली.

समजलेल्या माहितीनूसार,शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील क्रीडा शिक्षक नितीन चव्हाण हे घरात झोपले असताना त्यांना टोळक्याने घरातून उचलून नेवून भरचौकात बेदम मारहाण केली.टोळक्यातील काही जणांकडे काठ्या,दांडके तसेच कोयता असल्याचे समजते. जोपर्यंत आमच्या शिक्षकांना न्याय मिळत नाही,तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा घेत विद्यार्थ्यांनी आमच्या शिक्षकांना न्याय द्या अशा आशयाचे फलक हातात घेवून आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार अरूण उबाळे,शंकर बल्लाळ हे घटनास्थळी दाखल झाले.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026