थांबलेल्या वाहनांमधून डिझेल चोरी करणा-या आंतरराज्य टोळीचा म्होरक्या यवत पोलीसांच्या ताब्यात
-------------------
दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यात थांबलेल्या वाहनांमधून डिझेल चोरी करणा-या आंतरराज्य टोळीच्या म्होरक्याला यवत पोलीसांनी जेरबंद केले.
राजवीर गजराजसिंग म्हल्होत्रा वय ३६ रा.गावडेवाडी केसनंद ता.हवेली मुळ रा.दिल्ली असे डिझेल चोरीच्या टोळीतील म्होरक्याचे नाव असून त्याच्याकडून १४ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला .
दौंड तालुक्यातील पारगाव येथील सचिन अरूण बोत्रे यांच्या ट्रकच्या डिझेल टाकीचे झाकण उघडून ५०० लिटर डिझेल ३० ऑगस्ट २०२१ रोजी अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची फिर्याद यवत पोलीस स्टेशनला दिली होती .
डिझेल चोर राजवीर मल्होत्रा हवेली तालुक्यातील केसनंद येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानूसार यवत पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
कालिया उर्फ रूत्तमखान ,ईशान उर्फ इशकमेव, आज्जू उर्फ आशिक हुसेन महम्मद हुसेन ,फिरोज उर्फ भट्टा उर्फ शैकत कालू शहा या साथीदारांच्या मदतीने यवत परिसरात थांबलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी केल्याची कबूली त्याने दिली .
पोलीस निरीक्षक नारायण पवार पुडील तपास करत आहेत.