विवाहितेने गळफास घेत जीवन संपवले
शहरातील बोर्डिंग रोड येथील विवाहितेने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीला आली.
निकिता गौतम तुपेरे (४०, रा. मिशन कॅम्प, बोर्डिंग रोड, रत्नागिरी) असे विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिच्या नातेवाइकांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निकिता तुपेरे हिने अज्ञात कारणातून राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर साडीने गळफास घेतला. ही बाब तिच्या नातेवाइकांच्या लक्षात येताच, त्यांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. अधिक तपास पोलिस करत आहेत.